गणेश मूर्ती करा घरच्या घरी

Simple method of Ganapati Idol Making, Explained in Marathi

Course Summary

  Social Distancing च्या या जमान्यात गणेश मूर्ति आणण्यासाठी बाहेर जाणं सुरक्षित नाही आणि ती मूर्ति eco-friendly (मातीची) असेल याचीही खात्री नाही, मग आपणच अगदी सोप्या पद्धतीने एक श्रीगणेशाची मूर्ति का तयार करू नये?

माझा हा Online Course बघून, अशी मूर्ति स्वतः तयार करणं अगदी सोपं आहे, ते सुद्धा कोणताही साचा न वापरता!

माझं नाव मंदार मराठे आहे आणि मी एक चित्रकार आणि मूर्तिकार आहे. २०११ पासून मी काही हजार लोकांना अशी गणेश मूर्ति घडवायला शिकवलं आहे. अगदी ४ थी पाचवीतल्या मुलांपासून ते ७०- ७५ च्या आजी आजोबांपर्यंत!

तर या online  course मध्ये आपण सुरुवातीला मूर्ति  चे सुटे भाग तयार करणार, नंतर ते जोडणार, आणि मग मूर्तिचे बारकावे घडविणार. हे सगळं  मी तुम्हाला अगदी टप्याटप्यानं दाखवणार आणि सांगणार आहे म्हणजे तुम्हाला माझ्या बरोबरच अशी मूर्ति करता येईल. या पद्धती मुळे, तुम्ही आधी कधीही जरी मातीत काही केलं नसेल  तरीही तुम्हाला अशी मूर्ति करायला काहीही अडचण येणार नाही.
ही मूर्ति पूर्णपणे eco-friendly  तर असेलच पण स्वतः च्या हातानी, आपल्या कुटुंबीयांसोबत ती तुम्ही तयार केल्यामुळे त्याचं समाधान काही वेगळंच असेल.

चला तर मग, हा course घ्या आणि माझ्याबरोबर घरच्या घरी गणेश मूर्ति करा!

Course Curriculum

Mandar Marathe

Artist, Sculptor, & Art Educator

Course Pricing